Thu, Jun 27, 2019 12:35होमपेज › Belgaon › कारला अपघात; एक ठार

कारला अपघात; एक ठार

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:15PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा सौंदलग्याजवळ झालेल्या अपघातात  एक ठार, तर दोन जखमी झाले. गोव्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारवर विरुद्ध दिशेने ट्रक आदळल्याने  कारचालक संतोषकुमार सदाशिवराव कोगीलवाईमठ (वय 49) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी उषा (46) व मुलगी श्रेया (14, सर्व रा. हैदराबाद) या दोघी गंभीर जखमी झाल्या. कोगीलवाईमठ कुटुंबीय हे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात होते.

संतोषकुमार कुटुंबीयांसमवेत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. कोल्हापूरला जात असताना बेळगावकडे निघालेला ट्रक दुभाजकावरून कारवर आदळला. अपघाताची माहिती मिळताच पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे  निरीक्षक अण्णाप्पा खराडे व सहकारी तसेच निपाणी  ग्रामीणचे पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील, यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेत तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृत व जखमींना बाहेर काढले.उषा व श्रेया या दोघींना  म. गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात हलविले. ट्रकचालकाविरोधात निपाणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून तो फरारी आहे.