Sun, May 26, 2019 08:52होमपेज › Belgaon › कार उलटून चालक ठार

कार उलटून चालक ठार

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 04 2018 12:01AMअथणी : वार्ताहर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंडिका पलटी होऊन चालक  जागीच ठार झाला. जितेंद्रसिंग उदयसिंग हजारे (वय 38, रा. राजवाडा चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. अथणी - विजापूर राज्य महामार्गावर अथणी शहराच्या बाहेर दोन किलोमीटरवर रविवारी रात्री ही दुर्घटना घडली.

जितेंद्रसिंग हजारे येथील  भावाच्या घराच्या वास्तूशांतीस जात असताना हा अपघात घडला.  समोरुन येणार्‍या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.