Sat, Jul 20, 2019 02:57होमपेज › Belgaon › ...तर कँटोन्मेंटमध्येही सिमेंटचे जंगल

...तर कँटोन्मेंटमध्येही सिमेंटचे जंगल

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:28PMबेळगाव :परशराम पालकर

कँटोन्मेंट बोर्ड बरखास्त करून हा भाग स्थानिक स्वराज संस्थेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर आहे. पहिल्यांदा हा प्रस्ताव 2015 मध्ये समोर आला होता. तथापि, कँटोन्मेंट बरखास्त झाल्यास या भागातही सिमेंटचे जंगल उभारले जाईल, अशी भीती स्थानिकांना आहे.

देशातील 19 राज्यांत 63 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या बोर्डांवर वर्षाकाठी 417 कोटींचा खर्च होतोे. हा निधी संरक्षण खात्यावर खर्च केल्यास लष्कराला फायदा होईल, अशी सरकारची भूमिका आहे. याबाबत ‘पुढारी’च्या प्रतिनिधीुनी बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  

खुल्या जागा, बागा, शैक्षणिक संस्था आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजडे या भागात असलेली हिरवाई लक्ष वेधून घेते. पण कँटोन्मेंट बरखास्त झाल्यास खुल्या जागांवर इमारतीच उभ्या राहतील, झाडे तोडली जातील अशी भीती स्थानिकांना आहे.