Wed, Jul 17, 2019 20:10होमपेज › Belgaon › रेल्वे स्थानकांवर आता तिसरा डोळा

रेल्वे स्थानकांवर आता तिसरा डोळा

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 13 2018 8:30PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावसह 436 रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्यात 547 स्थानकावर सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यासाठी  कॅमेरे बसवण्यात येतील. त्यासाठी भारतीय रेल्वेकडून 2500 कोटीची तरतूद केली करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकावर भुरट्या चोर्‍या, पाकीटमारी, गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छेड काढणे या प्रकारांना उत आला आहे. रेल्वे पोलिसांबरोबर स्थानिक पोलिसांनीदेखील डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक रेल्वेस्थानकावर आता सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची योजना हाती घेतली असून भारतीय रेल्वेने 2500 कोटीची तरतूद केली आहे.  पहिल्या टप्यात 436 रेल्वेस्थानकावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

बेळगाव रेल्वेस्थानकावर दररोज पॅसेंजरबरोबर लांब पल्याच्या गाड्या येत असतात. बसच्या तुलनेत तिकीटाचे दर कमी असल्यामुळे सामान्यांचा ओढा रेल्वेने प्रवास करण्याकडे असतो. ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करीत असतात. तथापि, गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मंगळसूत्र, चेन, पैशाचे पाकिट, बँगा, पर्स लांबविण्याच्या घटना रेल्वेत व रेल्वेस्थानकावर वाढत आहेत. रेल्वे पोलिसांना चोरट्यांचा माग काढताना कोणताच पुरावा मिळत नाही. चोरटे स्थानिक असून त्यांचा नेहमी रेल्वेस्थानकावर वावर असतो. यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

कॅमेर्‍यांची संख्या वाढणार...

सद्या बेळगाव रेल्वेस्थानकावर तीन प्लॅटफॉर्मवर सहा आणि इतरत्र चार असे एकूण 10 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. पार्कींगमध्ये कॅमेरा आहे मात्र तो खराब आहे. आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती बेळगाव रेल्वेस्थानकातून देण्यात आली.