Mon, Feb 18, 2019 04:21



होमपेज › Belgaon › मजगाव येथील उद्योजकाची आत्महत्या

मजगाव येथील उद्योजकाची आत्महत्या

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:32PM



मच्छे : वार्ताहर

घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिपाण्णा शाबण्णा सातेरी (वय 67) या उद्योजकाने अनगोळ येथील तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. तिपाण्णा शनिवारी उद्यमबाग येथील आपल्या कारखान्यात जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, घरी परतलेच नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध चालविली होती. अखेर कुटुंबीयांनी उद्यमबाग पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. 

रविवारी त्यांची दुचाकी पिरनवाडी येथील नाक्याजवळ आढळून आली होती. सायंकाळी अनगोळ येथील सोमगिरी तलावात अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी टिळकवाडी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. अधिक चौकशी केली असता हा मृतदेह बेपत्ता झालेल्या तिपाण्णा यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तिपाण्णा गेल्या काही दिवसांपासून मानसिकद‍ृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते. ते म. ए. समितीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, विवाहित मुलगा, कन्या, नातवंडे असा परिवार आहे.