Tue, Nov 20, 2018 13:10होमपेज › Belgaon › बस प्रवास महागणार

बस प्रवास महागणार

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 10 2018 1:15AMबंगळूर : प्रतिनिधी

पुढील आठवड्यात एस.टी. बस प्रवास दरात वाढ होणार असल्याची माहिती परिवहनमंत्री डी. सी. तम्मण्णा यांनी दिली. मंड्या येथील चिक्कनायकनहळ्ळी येथे रविवारी (दि. 9) ते पत्रकारांशी बोलत होते.

इंधन दरवाढीमुळे तीन महिन्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सुमारे 180 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दररोज सुमारे दोन कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. यामुळे 18 टक्के प्रवास दरवाढ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंत्रिमंडळाने मान्य केला असून पुढील आठवड्यात दरवाढ लागू होईल, असे ते म्हणाले. 

पाच दिवसांपूर्वी मंत्री तम्मण्णा यांनी बस प्रवास दरवाढीचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली होती. यावर विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परिवहनला होत असलेल्या तोट्याची पर्यायी मार्गांनी जुळवणी केली जात आहे. आगामी काळात दरवाढ अटळ असल्याचे त्यांनी सांगितले होते.