Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Belgaon › खानापुरात शॉर्टसर्किटमुळे घर खाक

खानापुरात शॉर्टसर्किटमुळे घर खाक

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:47AMखानापूर : वार्ताहर

केंचापूर गल्लीतील त्रिनेत्रेश्‍वर मंदिराशेजारील घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून साडेचार लाखाचे नुकसान झाले. आग इतकी प्रचंड होती की घरातील तांब्याचे हंडे, ट्रेझरी आणि भांडी वितळून गेली.

शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास राजू गावडे आणि पिराजी तानाजी गावडे यांच्या घराला आग लागली. आगीने काही क्षणातच संपूर्ण घराला वेढले. घराला जुना लाकडी माळा व कौले असल्याने आगीच्या ज्वाळांनी सर्व साहित्य बेचिराख केले. भाताची पोती, इतर धान्य खाक झाले. दीड तोळ्याचे गंठण, अंगठी आणि कानातील दागिने वितळून गेले. अंथरुण, रंगकाम साहित्य, दुकानाचा किराणा माल आणि सर्व कपडे भक्षस्थानी पडले. 

अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तत्पूर्वी घरातील सर्व साहित्य बेचिराख झाले होते. घरी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. 
घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली असून तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांनी पाहणी केली.