Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Belgaon › भाजपचे ब्रम्हास्त्र ऑपरेशन कमळ

भाजपचे ब्रम्हास्त्र ऑपरेशन कमळ

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 11:01PMबेळगाव : प्रतिनिधी

2008 च्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही, ऑपरेशन कमळ राबवून राज्यात स्थिर सरकार देऊ केलेल्या भाजपने  यावेळीही तशीच परीस्थिती उद्भवल्याने, पुन्हा  ऑपरेशन कमळ आखले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

पैशाच्या आणि ताकतीच्या जोरावर विरोधकांमधील आवश्यक तेवढ्या सदस्यांना विकत घेण्याची यशस्वी खेळी सर्वप्रथम भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांनी खेळली. काँग्रेस व जेडीएसच्या 20 सदस्यांना पैशाच्या जोरावर फोडून येडींनी त्या वीस आमदरांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास प्रवृत्तकेले होते. 

2018 च्या निवडणुकीनेही, 104 सदस्य निवडून आलेल्या सदस्यसंखेने भाजपला यावेळीही  तांत्रिक अडचणीत आणले आहे. बहुमतासाठी आवश्यक 112 ची जादुई आकडेवारी गाठण्यासाठी  भाजपला   आणखी 5 -6 सदस्यांची  निकड आहे. उरलेली कमतरता पोटनिवडणुकीतून भरून काढण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. 

सर्वाधिक संख्याबळ ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी देण्यात यावी या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपाल सर्वप्रथम भाजपलाच सत्तास्थापनेसाठी पाचारण करतील, असे संविधान तज्ञांचे मत आहे. आवश्यक संख्याबळ सिध्द करता न आल्यास युतीचे सरकार स्थापित करता येते का हे आजमावण्यात येते. 

फोडाफोडीचा तसेच पोटनिवडणुकीचा उपाय कूचकामी ठरल्यास काँग्रेस व जेडी या सदस्यांना अनुपस्थित ठेवण्यासाठीचे उपाय करून, आपले संख्याबळ अधिक असल्याचे सिध्द करून सत्तास्थापनेचा पर्यायी मार्गदेेखील भाजप अवलंबू शकतो.

आर. आर. नगर विधानसभा मतदार संघातील निवडणूक 28 मे ला होणार आहे. तर जयनगर मतदारसंघातील निवडणूक अद‍्याप घोषित करण्यात आलेली नाही. भाजपासाठी या दोन मतदारसंघातील निवडणूक जिंकू किंवा मरू या धरतीवर लढवायच्या आहेत. मात्र त्या दोन जागा भाजपला मिळाले तरी आवश्यक संख्याबळ गाठता येत नाही.