Wed, Jun 26, 2019 11:42होमपेज › Belgaon › सीमाभागातील दूध टँकर कोगनोळीजवळ फोडले

सीमाभागातील दूध टँकर कोगनोळीजवळ फोडले

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 17 2018 12:15AMकोगनोळी : वार्ताहर

सीमाभागातून महाराष्ट्रात जाणारे दूध वाहतूक करणारे पाच टँकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील शेतकरी पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी 5 वा. घडली. 

बंगळूरहून पुणेकडे दूध वाहतूक करणारे ‘नंदिनी’ व महाराष्ट्रातील काही दूध संघाचे पाच टँकर पेट्रोलपंपाजवळ थांबले होते. अचानक चार वाहनांतून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येऊन टँकर चालकांना मारहाण करून टँकरमधील दूध खाली सोडून दिले. 

अचानक झालेल्या या घटनेमुळे तेथील एक टँकर महाराष्ट्राच्या दिशेने, तर अन्य तीन टँकर निपाणीच्या दिशेने पळविण्यात आले. एक टँकरचालक महंमद सौदागर याला मारहाण करून टँकरचे नुकसान करून दूध सोडण्यात आले.

घटनास्थळी निपाणीचे सीपीआय किशोर भरणी, पीएसआय निंगनगोडा पाटील, कागलचे डीवायएसपी सूरज गुरव आदींनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद झालेली नव्हती.