होमपेज › Belgaon › कर्नाटकातील मुरूम बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात

कर्नाटकातील मुरूम बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 12:51AM बोरगाव : वार्ताहर

बोरगाव (ता. निपाणी) येथील वडगेरी माळावरील सरकारी गायरानमधील मुरुम रात्री  ट्रॅक्टरच्या सहाय्याने महाराष्ट्रातील अब्दुललाट येथे नेण्यात येत आहे. दादागिरी  व मनमानी कारभार करून सरकारी गायरानातील मुरूम मोठ्या प्रमाणात नेत  असल्याचे उघडकीस आले. अब्दुललाट येथील ट्रॅक्टरमालक संजय पाटील यांच्या मालकीच्या टॅ्रक्टरमधून चालक व कर्मचार्‍यांच्या सहाय्याने हे मुरुम चोरी करण्यात येत होते.

ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच मुरूम चोरीबाबत विचारले.  ट्रॅक्टर मालक गणेश बडोदेने नागरिकांनाच शिवीगाळ करून दादागिरी केल्याचेही निदर्शनास आले. कर्नाटक महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने या मागील गौडबंगाल काय, असा सवाल नागरिकांतून होत आहे. इचलकरंजी येथील एका नामांकित पतसंस्थेच्या संचालकाकडून या प्रकरणाला अभय मिळत असल्याचे बोलले जाते. कर्नाटकात मुुरुम विक्री व चोरी बंद असताना बोरगाव येथे सरकारी गायरानातील मुरूमाची बेकायदेशीरपणे अनेक महिन्यांपासून चोरी करण्यात येत आहे. अशा माफियांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.