Sun, Nov 18, 2018 01:40होमपेज › Belgaon › सीमाभाग महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालाच पाहिजे

सीमाभाग महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालाच पाहिजे

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह कर्नाटकाच्या मगरमिठीत असणार्‍या 865 मराठी गावांचा समावेश विनाविलंब महाराष्ट्रात करण्यात यावा, असा  ठराव जुने बेळगावात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. त्याचबरोबर हलगा-पणजी महामार्गासाठी संपादित करण्यात येणारे भूसंपादन थांबवावे अशीही मागणी मेळाव्यात करण्यात आली. दोन्ही ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आले.

मराठी भाषिकांच्या एकीसाठी मंगळवारी जुने बेळगावात भव्य मेळावा झाला. व्यासपीठावर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्यासह उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी विशेष सीमाकक्ष अधिकारी दिनेश ओऊळकर, कोल्हापूर जि. प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने होते. ओऊळकर आणि माने यांनी मराठी भाषिकांच्या लढ्यावर मार्गदर्शन केले.