Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट शिक्षकां’साठी पुस्तकांचे काम बेळगावात

‘स्मार्ट शिक्षकां’साठी पुस्तकांचे काम बेळगावात

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

अझिम प्रेमजी फाऊंडेशनने प्रतिभावंत शिक्षकांना एकत्रित करुन शिक्षकासांठी मार्गदर्शिकेची निर्मिती केली आहे. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्व विकासात ही पुस्तके महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. मूळ कन्नड आणि इंग्रजीत असणार्‍या या पुस्तकांच्या भाषांतराचे काम बेळगावातील सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयात सुरू आहे.

व्यक्तिमत्त्व विकासाची एकूण 28 पुस्तके कर्नाटक शासनाने कन्नडमध्ये प्रकाशित केली आहेत. त्यापैकी 20 पुस्तकाचे भाषांतराचे काम बेळगावात सुरु असून मराठी व कन्नड माध्यमाचे 135 शिक्षक गेले सहा दिवस हे काम करत आहे.  20 जूनपर्यंत भाषांतराचे काम पूर्ण करायचे आहे.

सदर पुस्तके मानसशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र व गणितशास्त्रवर आधारीत आहेत. 28 पैकी 20 पुस्तकाचे भाषांतराचे काम बीएड कॉलेजच्या सायन्स हॉलमध्ये सुरु आहे. 135 शिक्षक सलग दहा दिवस भाषांतराचे काम करणार असल्याची माहिती साधन अधिकारी एन. आर. काळे यांनी दिली.बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापूर, कागवाड, अथणी, निपाणी, हुक्केरी येथील सीआरपीना पाचारण केले आहेे. 135 शिक्षकांमध्ये मराठी व कन्नड अशा द्विभाषा येणार्‍या शिक्षकांचा जास्त  भरणा आहे. दूरवरून आलेल्या शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्थाही प्रशासनाने बेळगावातच केली आहे.

मराठी भाषांतराचे काम बेळगावात तर उर्दू भाषांतराचे गुलबर्गा येथे चालू आहे. भाषांतरकारांमध्ये साधन व्यक्तींचा (सीआरपी) तसेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि व कॉलेजमधील प्राध्यापकांचा समावेश आहे. मराठी व कन्नड भाषेवर प्रभुत्व असलेल्या शिक्षकांनाच भाषांतरासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. पहिली ते दहावीपर्यंत अभ्यासक्रमात असलेली पुस्तके मराठी, गणित, समाज विज्ञान व विज्ञान   या विषयातील थोडा भाग व पदवी अभ्यासक्रम, मानसशास्त्र विषयातील दाखल्यांचा पुस्तकात समावेश आहे.