Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Belgaon › शहरात आज हनुमान जयंती

शहरात आज हनुमान जयंती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहर परिसरात आज शनिवारी संकटमोचन, सामर्थ्याची देवता म्हणून ज्याकडे पाहिले जाते, अशा महाबली श्री हनुमानाचा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिषेक, लघुरुद्राभिषेक, पूजा, जन्मोत्सव, पाळणा, हनुमान चालिसा पठण, भजन, कीर्तन, महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. उत्सवानिमित्त हनुमान मंदिरांची रंगरंगोटी व  आकर्षक रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. सुशोभित मंडप उभारण्यात आला आहे.

मारुती गल्लीतील मारुती मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री 12 वा. रुद्राभिषेक, पहाटे 3 वा. आरती, मूर्तीची अलंकारिक  पूजा, 5.30 वा. प्रवचन, 6.30 वा. जन्मोत्सव, पाळणा, आरती, तीर्थप्रसादानंतर दुपारी 4 वा रथोत्सव होईल. मारुती मंदिरापासून रथोत्सवास प्रारंभ. त्यानंतर नरगुंदकर भावे चौक, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळकचौक, रामलिंग खिंड गल्लीमार्गे परत मारुती मंदिरात सांगता.
गौड सारस्वत ब्राम्हण समाजातर्फे श्री हरिमंदिर समोदव गल्लीतील हनुमान मंदिर येथे विलास हवालदार यांच्या हस्ते पहाटे सूर्योदयाला श्री मूर्तीची पूजा होणार आहे. नंतर अ्रभिषेक व जन्मोत्सव साजरा होणार आहे.

श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्टतर्फे पहाटे 4 वा. अभिषेक, हभप कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन, सूर्योदयाला जन्मकाळ, आरती, तीर्थप्रसाद  व दुपारी 12 वाजता महाप्रसाद होणार आहे.
सोमवारपेठ, टिळकवाडी येथील  श्री हनुमानाच्या सन्मुख मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठानेचा रौप्यमहोत्सव व हनुमान जयंती असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. पहाटे 6 वा. जन्मोत्सव, आरती, दुपारी 12 वा. महाप्रसाद, सायंकाळी 6 वा. सखी शारदा भजनी मंडळ, विद्यानगरचा भजन कार्यक्रम, रात्री 8.30 वा. आरती होणार आहे.

द्वारकानाथ, पाचवा क्रॉस टिळकवाडी येथील दक्षिणाभिमुख मारुती मंदिरात काकडा आरती, नित्यपूजा, जन्मोत्सव, पाळणा, श्री पवमान होम, पंचामृत अभिषेक, महापूजा व दुपारी 1 वाजता महाप्रसाद होणार आहे.

धर्मवीर संभाजीनगर, वडगांव येथील श्री गणेश मंदिर व सांस्कृतिक ट्रस्ट, धर्मवीर संभाजी युवक मंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने गणपणतीˆहनुमान मंदिरात हनुमान जयंती होणार आहे. सकाळी 6.30 वा. जन्मसोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
मारुती गल्लीतील मारुती मंदिर, संयुक्त महाराष्ट्र, कपिलेश्‍वर हनुमान मंदिर, रजपूत समाजाचे मारुती मंदिर, आरटीओ सर्कल सोन्या मारुती मंदिर, चन्नम्ना सर्कल गणपती मंदिरातील मारुती मंदिर, संचयनी सर्कल कॅम्प येथील उभा मारुती, राणी चन्नम्मानगर, खडेबाजार पोलिस स्थानकातील मंदिर, शहापूर आचार्य गल्ली राममंदिर, मारुती देवस्थान शहापूर, माळमारुती देवस्थान, संभाजीनगर, आचार्य गल्लीˆशहापूर, वडगाव येथील मारुती मंदिर, मारुती गल्ली अनगोळ, नागझरी कॉलनी येथील मंदिर तसेच अन्य मंदिरांसह ग्रामीण भागातील मंदिरातून जयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.


  •