Tue, Apr 23, 2019 23:35होमपेज › Belgaon › ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:45PMबोरगाव : वार्ताहर     

टॅ्रक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात नेमिनाथ तपकिरे (वय 38, रा. शमनेवाडी) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बोरगाव?सदलगा मार्गावर शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नेमिनाथ तपकिरे हे येथील अरिहंत सौहार्द संस्थेच्या जमखंडी शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. बोरगाव येथील मुख्य संस्थेमध्ये शनिवारी सकाळी मासिक बैठक होती. बैठकीसाठी  तपकिरे जमखंडी येथून दुचाकीवरून बोरगावला येत होते. बोरगाव? सदलगा मार्गावरील धोकादायक वळणावर बोरगावकडून येणार्‍या ट्रॅक्टर व दुचाकीची धडक झाली.