Wed, Apr 24, 2019 00:05होमपेज › Belgaon › भुईकोट किल्ल्याचाही ‘स्मार्ट’ विकास

भुईकोट किल्ल्याचाही ‘स्मार्ट’ विकास

Published On: Aug 15 2018 2:04AM | Last Updated: Aug 15 2018 2:04AMबेळगाव : प्रतिनिधी

स्मार्टसिटी योजनेतून शहराचा कायापालट केला जाणार आहे. त्याचबरोबर शहराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणार्‍या किल्ल्याचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. 
स्मार्ट सिटीत योजनेतून किल्ल्यात विकासकामे राबविण्यात येणार असून, त्यासाठी खा. सुरेश अंगडी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाहणी करण्यात आली. बेळगावच्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किल्ल्यात पर्यटन सुरू करण्याचाही विचार आहे. किल्ल्याच्या मूळ बांधकामाला आणि सौंदर्याला धोका न आणता विकास करणे आवश्यक आहे. 

किल्ल्यामध्ये असणार्‍या कमलबस्तीचा ताबा पुरातत्व विभागाकडे आहे. त्या विभागाच्या नियमांचा अभ्यास करून आराखडा आखण्यात येणार आहे. किल्ल्यासभोवती असणार्‍या खंदकाचा वापर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केला जाणार आहे. खंदकाची दुरुस्ती करून तटबंदीची झाडीपासून होणारे नुकसान रोखण्यात येणार आहे. खा. अंगडी यांनी अधिकार्‍यांना सूचना मांडल्या. यावेळी संरक्षण खात्याचे सहसचिव गोळ, बंगळूर येथील कॅन्टोन्मेंट अधिकारी, मनपा आयुक्त शशीधर कुरेर, कॅन्टोन्मेंट सीईओ दिव्या शिवराम, मनपा अभियंता लक्ष्मी निपाणीकर आदीसह अधिकारी उपस्थित होते.