Wed, Nov 14, 2018 23:39होमपेज › Belgaon › भरतला एसआयटीने गोवले : पत्नीचा दावा

भरतला एसआयटीने गोवले : पत्नीचा दावा

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 11:04PMबेळगाव : प्रतिनिधी

गौरी हत्याप्रकरणात संभाजी गल्लीतून अटक करण्यात आलेला भरत  कुरणे  निर्दोष असून, त्याला एसआयटीने हत्याकांडात गोवले आहे, असा दावा भरतची पत्नी गायत्री तसेच आई रेखा यांनी गुरुवारी केला. कन्‍नड साहित्य  भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गायत्री व रेखा कुरणे म्हणाल्या, भरतने 31 ऑक्टोबर 2013 रोजी चिखले येथे रिसॉर्टसाठी तीन एकर जागा खरेदी केेली. 26 जानेवारी 2015 रोजी  रेसॉर्ट सुरू करण्यात आले. मात्र, नंतर ही जागा एन. ए. न झाल्यामुळे रिसॉर्ट बंद करण्यात आले. रिसॉर्ट आवारात लॉनचे (हिरवळ) काम करताना व्यावसायिक अमोल काळे याच्याशी भरतच  संबंध आला होता. हा संबंध केवळ व्यावसायिक असताना पोलिसांनी हत्याकांडाशी संबंध जोडून भरतला अटक केली आहे. हे बेकायदेशीर आहे. त्याच्यावरच आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. सनातन संस्थेशीही तो संबंधित नव्हता. तो स्वत: गेल्या दीड वर्षाबासून पचन विकाराने आजारी आहे. असे असताना त्याला निष्कारण याप्रकरणात गोवण्यात आले आहे.

गौरी यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी झाली. त्यावेळी भरतवर बेळगावमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, असा दावा गायत्री यांनी केला. 25 ऑगस्टला तो रुग्णालयात दाखल झाला, त्यानंतर 28 ऑगस्टला त्याला घरी सोडण्यात आले. पुन्हा 9 सप्टेंबरला तो दाखल झाला. या दरम्यानच्या काळात तो घरी झोपूनच होता. मग त्याचा हत्येत सहभाग कसा? सध्या तपासाच्या नावाखाली त्याचा खूप मानषसक छळ केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.