Sun, May 19, 2019 14:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › भारत गो-यात्रेचे बेळगावात जल्‍लोषी स्वागत

भारत गो-यात्रेचे बेळगावात जल्‍लोषी स्वागत

Published On: Dec 17 2017 1:30AM | Last Updated: Dec 16 2017 11:35PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकसह  देशभरातील गोरक्षेकरिता रामचंद्रपूर मठाचे महास्वामीजी राघवेश्‍वर भारती यांच्या नेतृत्वाखाली कुमठा येथून आयोजित केलेल्या भारत गो-यात्रेचे आगमन बेळगाव येथे झाले असून या यात्रेचे जल्लोषी स्वागत कित्तूर चन्नम्मा येथे करण्यात आले. गो-यात्रेमध्ये विविध प्रकारच्या गायींचा समावेश असून ही गो-यात्रा म्हणजे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

अशाप्रकारच्या गो-यात्रेचे पहिल्यांदाच बेळगाव शहरात आगमन झाले आहे. रामचंद्रपूर मठाचे राघवेश्‍वर भारती स्वामीजी यांनी विविध गायींचे संगोपन केले आहे. मागील 3 डिसेंबरपासून कुमठा येथून या गो-यात्रेला प्रारंभ झाला आहे. उत्तर कन्नड, गदग, बागलकोट येथून ही यात्रा सुरू होऊन आता बेळगावमध्ये आगमन झाले आहे. 

कित्तूर चन्नम्मा चौक येथे आर्ष विद्यालय टिळकवाडीचे चित्प्रकाशानंद स्वामीजी, सुतगट्टीचे शिवानंद महास्वामीजी, राजेंद्र जैन, विश्‍व हिंदू परिषदेचे सुनील चौगुले, प्रभू निलजकर, खानापूरचे भरण्णा पाटील, श्रीरामसेनेचे रामाकांत कोंडूसकर, एम. के. हेगडे, इस्कॉनचे कल्लाप्पा, बाबुराव  पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.