Thu, Nov 22, 2018 01:31होमपेज › Belgaon › महिलांसाठी बंगळूर शहर असुरक्षित : स्मृती इराणी

महिलांसाठी बंगळूर शहर असुरक्षित : स्मृती इराणी

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:44PMबंगळूर : प्रतिनिधी

राज्याची राजधानी असणारे बंगळूर शहर महिलासाठी असुरक्षित आहे. शहरात दिवसाढवळ्या पोलिस अधिकार्‍यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्यात येत आहेत. यामुळे येथील सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येते. ज्याठिकाणी पोलिसांची पत्नी असुरक्षित आहे, तेथे सर्वसामान्यांची काय गत, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. येथील बोम्मनहळ्ळी विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या ‘बंगळूर वाचवा’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. 

इराणी म्हणाल्या, काँग्रेसच्या राजवटीत पोलिस अधिकारीच धोक्यात आले आहेत. त्यांच्यावर हल्ले होत आहेत. यामुळे हे सरकार सामान्यांना काय सुरक्षा देणार? गांधी परिवाराच्या नेतृत्वाखाली देश अधोगतीला गेला. देशाचा विकास खुंटला. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून देशाचे चित्र बदलले आहे. विकासाचे वारे वाहू लागले आहे. देशातील सर्व जातीधर्माच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तिहेरी तलाक या अनिष्ठ पद्धतीवर बंदी आणण्यात आली आहे.

यामुळे लाखो मुस्लिम महिलांना दिलासा मिळाला आहे.  देशात सध्या कमळ उगवले आहे. येत्या काळात राज्यात होणार्‍या निवडणुकामध्ये भाजपा सत्तेवर येणार आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले आहे. येत्या काळात कर्नाटक काँग्रेसमुक्त करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महिला असुरक्षित आहेत. खून, दरोडे, मारामारी, भ्रष्टाचार यासारख्या घटना वाढत आहेत. यामुळे बंगळूर शहर गुन्हेगारांचा अड्डा बनत आहे. बंगळूरच्या या स्थितीला जबाबदार असणार्‍या काँग्रेसला हद्दपार करा.