Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Belgaon › महिलेचे गंठण लंपास 

महिलेचे गंठण लंपास 

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:11PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी     

 शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती येथे रेणुकादेवीच्या यात्रेला गेलेल्या बेळगाव येथील एका महिलेचे सुमारे 70 हजारांचे सोन्याचे गंठन लंपास करण्यात आल्याचा प्रकार यल्लम्मा डोंगरावर घडला आहे.
बेळगाव येथील जाधव कुटुंबीय   सौंदत्ती येथे यात्रेसाठी सोमवारी गेले होते. या कुटुंबातील एक महिला डोंगरावरील जोगुळभावी येथे अंघोळीसाठी निघालेली असताना 3?4 महिलांनी त्यांना हाक मारली.  सदर महिला तिकडे गेल्यानंतर महिलांच्या टोळीपैकी एका महिलेने जाधव कुटुंबातील महिलेच्या गालावर थप्पड मारली. त्याचक्षणी ती महिला खाली बसली. भामट्या महिलांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन काढून घेऊन तेथून पोबारा केला.

जाधव कुटुंबातील महिलेने कुटुंबीयाना या प्रकाराची माहिती दिली. देवस्थानातील पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलेले असताना तेथील पोलिस बंदोबस्तावर असल्याने जाधव कुटुंबीयांची तक्रार पोलिसांत दाखल झाली नाही. दरम्यान, रेणुका देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी, देवस्थानस्थळी दागिने घालून येऊ नयेत, अशी सूचना देवस्थान मंडळाकडून नेहमी  करण्यात येत असते.