होमपेज › Belgaon › हॅप्पी न्यू इयर..

हॅप्पी न्यू इयर..

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 10:47PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेली तरुणाई, फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेले फुगे, संगीतावर थिरकणारी पावले...हॅप्पी न्यू इयर शुभेच्छांचे स्वर, पार्ट्यांची धूम, बाराच्या ठोक्याला ओल्डमॅनचे दहन, शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण पदार्थांची मेजवानी... ठीक बारा वाजता एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा देत बेळगावकरांनी नववर्षाचे जल्‍लोषी स्वागत केले.

मध्यरात्री 12 चा ठोका होताच एसएमएस, ई-मेल, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप आदी सोशल साईटस्वरून नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता. ठिकठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृतींचे दहन करून तरुणाई रस्त्यावर उतरल्याने सारे रस्ते फुलून गेले होते. आनंदाची खरी मजा लुटण्यासाठी बहुतेकजणांनी बाहेर पडणे पसंत केले. थर्टी फर्स्टचा दिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या खास शैलीत सेलिब्रेशन करत होता. सोसायट्या अपार्टमेंटमधून तर जल्लोषाची धूम होती. मित्र, परिवार, नातेवाईक, बच्चे कंपनी, तरुणाईने थर्टी फर्स्टचा मनमुराद आनंद लुटला. ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. 

खानावळी, हॉटेल्स, परमिट रूम, गार्डन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, फुल्ल झाले होते.