Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Belgaon › ओल्ड जाऊ द्या.....जाळुनि टाका

ओल्ड जाऊ द्या.....जाळुनि टाका

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:24AM

बुकमार्क करा
बेळगाव ः प्रतिनिधी

जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरूनि टाका या ओळींमध्ये थोडा बदल करून ओल्डमॅन जाळताना त्याबरोबर आपल्यातील दुर्गनही जाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. नवे वर्ष म्हणजे नवा उत्साह आणि नवे चैतन्य. त्यमुळेच नव्या वर्षाचे स्वागत हे केवळ ओली पार्टी साजरी करून करायची नाही तर एक संकल्प देखील करायचा असतो. संकल्प करताना त्या संकल्पाचे पालनही तितकेच गरजेचे आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. नव्या वर्षाच्या स्वागताबरोबर अनेक जण नवनवीन संकल्प करतात. मात्र, त्याचे पालन फक्त काही दिवस, महिनेच झालेले दिसते. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून नुतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढील वर्षी कोणता नवीन संकल्प करावा, असा विचार सुरु होतो. काहींच्या मनात सुरु असलेले विचार थर्टी फर्स्टच्या रात्रीच मद्याच्या सुगंधात तर काहींचे सिगारेटच्या धुरात विरून जातात. परंतू काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघीप्रमाणे असतात.

हे लोक आपले संकल्प कृतीतच आणता. त्यांचे हे संकल्प एक-दोन दिवसांसाठी नव्हे तर वर्षानुवर्षे पाळले जातात. मग त्यांची पेरणा घेऊन प्रत्येकांने संकल्प करणे गरजेचे असते. फक्त संकल्प करून काही उपयोग नाही. त्याचे पालनही व्यवस्थित व्हावे. असे करा संकल्प स्वतःसाठी वेळ काढा, सकारात्मक विचार करायला शिका, स्वतःची कामे स्वतः करा, दरारोज व्यायाम, योग, वाहन चालवितांना सुरक्षेची काळजी घ्या, स्वच्छता, दारु, सिगारेट, आणि गुटखा अशा सवयी असतील तर त्या सोडायचा प्रयत्न करा.

आरोग्याकडे लक्ष द्या, वृक्षरोपनाला प्राथमिकता द्या, रक्तदान, नेत्रदान करा, जखमी झालेल्यांना तातडीची मदत करा. स्वतःकडचे ज्ञान दुसर्‍यांना देण्याचा प्रयत्न करा, विद्यार्थ्यांना दत्तक घ्या, गरजूंना मदत करा, भेट वस्तू म्हणून पुस्तके घ्या, वाढदिवस अनाथआश्रम किंवा वृद्धाश्रमात साजरे करा. स्वतः जगा दुसर्‍यांना जगवा आदी संकल्प करा पण ते सिद्धीस न्या. यासाठी कृतीशिल बना.