Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Belgaon › बेळगाव येथे व्हावे मराठीचे विद्यापीठ : डॉ. राजेंद्र कुंभार

बेळगाव येथे व्हावे मराठीचे विद्यापीठ : डॉ. राजेंद्र कुंभार

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:55PMउचगाव साहित्य संमेलनात करवेचा निषेध

बेळगाव : प्रतिनिधी

‘प्रत्येक विद्यापीठात इतर देशांच्या भाषा शिकविल्या जातात. मात्र, आपल्या देशात इतर राज्यांची भाषा शिकविली जात  नाही. मराठी हा आपला बालेकिल्ला आहे. बेळगावात मराठी जिवंत ठेवण्यासाठी येथील मराठी नेत्यांनी बेळगावात मराठी लोकविद्यापीठाची स्थापना करावी’, असे मत सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुभार यांनी मांडले.

उचगाव मराठी साहित्य संमेलनात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते. डॉ. कुंभार  म्हणाले, ‘जोपर्यंत सीमाभागात मराठी जिवंत आहे, तोपर्यंत हा लढा संपणार नाही. सीमाप्रश्‍नासंदर्भात राज्यकर्त्यांना सांगणे हा मूर्खपणा वाटतो. सीमाप्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे. तो जिवंत ठेवण्यासाठी रस्त्यावरची लढाईदेखील लढली पाहिजे. शिवराय व संत तुकारामांनी केलेल्या गनिमी काव्याचा वापर करून आम्हाला या राज्यकर्त्यांना  धडा शिकवावा लागेल.

गौडाचा खेद  वाटतो ः डॉ. कुंभार

लढाऊपणा पुढच्या पिढीला द्या मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. मराठी लढाऊपणा, संस्कृती पुढील पिढीच्या हातात आपण सोपविली पाहिजे. भाषा प्राचीन तर आहेच, त्यात विज्ञान-तंत्रज्ञान पेलण्याची ताकद आहे. ही ताकद पेलली जाऊ नये, असे प्रयत्न आंतरराष्ट्रीय शक्‍ती करत आहे, असा खेद संमेलनाध्यक्षांनी व्यक्‍त केला.