Sat, Jul 11, 2020 17:06होमपेज › Belgaon › अनधिकृत बांधकामे अंधारात पथदीपांवर ‘प्रकाश’

अनधिकृत बांधकामे अंधारात पथदीपांवर ‘प्रकाश’

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

अनधिकृत  बांधकामांवरून धारेवर धरल्या जाण्याच्या भीतीने मनपा अभियंत्यांनी मंगळवारच्या बैठकीला दांडी मारली. परिणामी, शहरातील अनधिकृत बांधकामाच्या विषयाला बगल देऊन पथदीप व्यवस्थेवर चर्चा झाली, पण ती चर्चाही निष्फळच ठरली. त्यामुळे बांधकाम स्थायी समितीच्या कामकाजात गांभीर्याचा अभाव दिसत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बांधकाम स्थायी बैठकीत शहरातील अनधिकृत बांधकामांवरून उपस्थित सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे काय करायचे, यावर निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार आज बैठक झाली; पण अनधिकृत बांधकामावरून आपल्याला धारेवर धरले जाईल,

या भीतीने बांधकाम विभागातील अभियंत्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. प्राप्त माहितीनुसार शहरात सुमारे 80 हजार बांधकामे अनधिकृत आहेत. स्थायी अध्यक्ष पिंटू सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत प्रामुख्याने पथदीप व्यवस्थेवर  चर्चा झाली. याचवेळी स्थायी समिती सदस्य राकेश पलंगे व मधुश्री पुजारी यांनी दै. ‘पुढारी’तील ‘शहरातील अनधिकृत बांधकामे सुसाट’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून उपस्थित अधिकार्‍यांना धारेवर धरले. याचबरोबर अध्यक्षांना अनधिकृत बांधकामावर सविस्तर चर्चा घडवावी, अशी विनंती केली.