Mon, Jan 21, 2019 15:09होमपेज › Belgaon › गांधील माश्यांचा हल्ला; तुर्केवाडीचा शेतकरी ठार

गांधील माश्यांचा हल्ला; तुर्केवाडीचा शेतकरी ठार

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 09 2017 12:24AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गुरुवारी दुपारी किरकोळ कामासाठी शेतात गेलेल्या सातू मर्‍याप्पा कांबळे (वय 66) रा. तुर्केवाडी ता. चंदगड यांच्यावर गांधील माश्यांंनी अचानक हला चढविला. गांधील माश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सातू यांचे शुक्रवारी पहाटे बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मयत सातू हे  शेतात लाकडे तोडत असनाना गांधील माश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. गांधील माश्यांच्या हल्ल्यांनी सातू भांंबावून गेले. आसपासच्या शेतात काम करणार्‍या गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. गांधील माश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सातू यांना तुर्केवाडी येथील खासगी दवाखान्यात  उपचारासाठी नेण्यात आले. सातू यांची गंभीर प्रकृती पाहून त्यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे  4 वा.  सातू यांचा मृत्यू झाला. शवचिकित्सेनंतर मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. मयत सातू यांच्या पश्‍चात पत्नी, एक चिरंजीव,  तीन विवाहित कन्या असा परिवार आहे.