Mon, Jun 17, 2019 18:47होमपेज › Belgaon › पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत बेळगाव अव्वल

पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत बेळगाव अव्वल

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 9:56PMबेळगाव : प्रतिनिधी

गत आर्थिक वर्षात संपूर्ण कर्नाटकात 3,06,273 महिलांनी तर केवळ 917 पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. यापैकी बेळगाव जिल्ह्यात शस्त्रक्रिया करवून घेणार्‍या पुरूषांची संख्या सर्वाधिक 133 आहे. तर हावेरी जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 2 पुरूषांनी अशी शस्त्रक्रिया करून घेतली.आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. महिलांच्या तुलनेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणार्‍या पुरूषांची संख्या अगदीच कमी आहे. 2013-14 मध्ये 1,389 पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली होती. 

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरूषांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळेच केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पुरूष अशी शस्त्रक्रिया करून घेततात. परंपरा, अंधश्रद्धा, भीती, पुरूषत्व कमी होण्याची भीती अशा विविध गैरसमजांमुळे पुरूष यापासून दूर जातात. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातील पुरूषही यापासून दूर राहतात. कुटुंब नियोजन अंतर्गत महिलांपेक्षा पुरूषांसाठी अधिक सुरक्षित शस्त्रक्रियेच्या सुविध उपलब्ध आहेत. याविषयीची जागृती त्यांच्यात करण्याची गरज आहे. बहुतेक पुरूष याविषयी कोणताही प्रश्‍न विचारण्यास लाजतात किंवा घाबरतात. वयस्कर लोक त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांच्यात भीती निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे. तर 25 टक्के महिलांचा पुरूषांच्या शस्त्रक्रियेला विरोध असल्याचे मत आरोग्य खात्याने व्यक्‍त केले आहे.