Thu, Jun 27, 2019 02:00होमपेज › Belgaon › बेळगावची सई होणार मराठी बिग बॉस?

बेळगावची सई होणार मराठी बिग बॉस?

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

समस्त महाराष्ट्र व बेळगावकरांचे लक्ष लागून  राहिलेल्या मराठी बिग बॉस कार्यक्रमाची अंतिम फेरी 22 जुलैरोजी पार पडणार असून,  बेळगावची कन्या सई लोकूर विजेती ठरणार का, हाच प्रश्न बेळगावकर प्रेक्षकांसमोर  आहे.  सई ही दिग्दर्शक विना लोकूर यांची कन्या होय. तिने डीपी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गोगटे कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेऊन तिने मुंबईला फिल्म इंडस्ट्रीज करिअर सुरु केले. कॉमेडी किंग कपिल शर्मा यांच्याबरोबर किस किस को प्यार करू या हिंदी सिनेमात सईने काम केले आहे. प्लॅटफॉर्म, आम्हीच तुमचे बाजीराव, नो एंट्री, जराब, मी आणि ती या मराठी सिनेमातही सईने काम केले आहे. 

मराठमोळ्या बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये सुरुवातीला 15 जण एका छताखाली आले होते. त्यामध्ये दोघांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आता सहा जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. तक्रार, कधी हास्य, कधी बहार, कधी प्रेम तर कधी भांडण...कधी मैत्री तर कधी आव्हानांसाठी स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस... या घरांमध्ये कलाकरांना अनेक अडचणींवर मात करावी लागली. तसेच त्यांच्या अनेक सवयींना मुरड घालावी लागली. मोबाईल, टीव्ही, पुस्तक वाचने किंवा लिहिण्याची संधी नव्हती. मराठी बीग बॉसमध्य कलाकार राजेश श्रृंगारपुरे, विनीत, जुई गडकरी, आस्ताद काळे, अनिल ताटे, स्मिता गोंडकर, भुषण कडू, उषा नाडकर्णी, पुष्कर जोग, सई लोकुर, ऋतूजा धर्माधिकारी, सुशांत शेलार, रेशम टीपनिस, मेघा धाडे, आरती सोळंकी व वाईल्ड कार्ड इंन्ट्री म्हणून समिष्ठा राऊत हीचा समावेश झाला होता. बिग बॉसचे सूंत्रसंचालन दिर्ग्दशक महेश मांजरेकर करत आहेत.