होमपेज › Belgaon › तळीरामांना वेध  ३१ चे

तळीरामांना वेध  ३१ चे

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 8:11PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी तळीरामांचा उत्साह वाढला आहे.अनेकांनी बड्या हॉटेलातून मद्याचे पेले रिचविण्याचे प्लॅनिंग केले असताना अनेक तळीरामांनी नेहमीच्या मोक्याच्या व खुल्या जागेत थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्याचा बेत आखला आहे. अलीकडच्या काळात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनात दारूला पसंती देण्यात येते. शासनाला वर्षाकाठी अबकारी रूपात 18 हजार कोटी रुपये महसूल मिळतो. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महामार्गांवर मद्यविक्री बंदी आदेश जारी केला.

यामुळे जिल्ह्यातील राजमार्गावरील 130 दारू दुकाने, बार बंद झाले. एकट्या बेळगावात 169 दारू दुकाने व बार आहेत. शहरात महिन्याकाठी विविध प्रकारच्या 54 हजार बॉक्सची विक्री होते. जिल्ह्यात दारू विक्रीपासून दरवर्षी 1150 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळतो. गेल्या वर्षी थर्टी फर्स्टला एकाच दिवशी मद्याच्या सहा हजारहून अधिक बॉक्सची विक्री  झाली. शहरातच एका दिवशी नेहमीपेक्षा 2500 बॉक्सची जादा विक्री झाली.