Thu, Jun 20, 2019 01:49होमपेज › Belgaon › शिक्षकांच्या रिक्‍त जागा भरणार

शिक्षकांच्या रिक्‍त जागा भरणार

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 10:56PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील खासगी व अनुदानित माध्यमिक आणि अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयांतील रिक्‍त जागा भरण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. यापूर्वी डिसेंबरअखेरपर्यंत या जागा भरण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, आता तातडीने याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. खासगी माध्यमिक अनुदानित शाळांतील 31 डिसेंबर 2014 आणि पदवीपूर्व अनुदानित

महाविद्यालयांतील 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या रिक्‍त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. या जागा भरण्यात आल्यानंतर 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या रिक्‍त जागा भरण्याबाबतही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे पंधरा हजार शिक्षकांना व प्राध्यापकांना लाभ होणार आहे.