Sat, Aug 17, 2019 16:25होमपेज › Belgaon › कोंडुसकोपच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू

कोंडुसकोपच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:36PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

मंगळवारी घरातून कामासाठी निघालेल्या कोंडुसकोप येथील भीमसेन रामाप्पा करगुप्पीकर (वय 48) याचा मृतदेह कमकारहट्टीनजीक गुरुवारी आढळला. मृत्यूसंदर्भात संशय व्यक्त करण्यात येत आहे. बागेवाडी पोलिस ठाण्यात भीमसेनचा मुलगा मंजुनाथ याने तक्रार दिली आहे. पभीमसेन मंगळवारी कामासाठी एम. के. हुबळीला गेला होता. तो फरशी कामगार होता. मंगळवारी काम आटोपून त्याने मित्रांसह रात्री पार्टी केलती. नंतर दोन दिवस भीमसेन घराकडे परतलाच नाही. घरातील मंडळी त्याचा शोध घेत होती. 

गुरुवारी दुपारी कमकारहट्टीनजीक एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. भीमसेनचा मृतदेह जिल्हा शवागाराकडे पाठविण्यात आला.  मृतदेह भीमसेनचा असल्याचे निदर्शनास आले. कुटुंबियांना याची माहिती कळविण्यात आली. गुरुवारी मंजुनाथने पोलिसांत तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी शवचिकित्सा करण्यात आली. नंतर मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर कोणत्याच प्रकारचे घाव अथवा जखमा आढळल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.