Sun, Jan 20, 2019 00:08होमपेज › Belgaon › तीन नगरसेवकांसह ५ जणांना समन्स

तीन नगरसेवकांसह ५ जणांना समन्स

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:42PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती बंदीविरोधात जुलैत काढलेल्या मोर्चाप्रकरणी शहापूर पोलिसांनी तीन नगरसेवकांसह 5 जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी तृतीय न्यायालयाने 5 जणांना समन्स बजाविले आहे. मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

न्यायालयाच्या वतीने  सोमवारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हेमंत गोपाळ हावळ (रा. केळकर बाग) यांच्यासह नगरसेवक विनायक गुंजटकर, नगरसेवक मोहन भांदुर्गे नगरसेवक मनोहर हलगेकर व विजय जाधव यांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश बजाविण्यात आला आहे. जुलैत शिवाजी उद्यान येथून पीओपी मूर्ती बंदीविरोधात मोर्चा काढला होता. यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. अशा वेळी तीन नगरसेवक व अन्य दोघांना समन्स बजावले.