Mon, Jun 24, 2019 21:22होमपेज › Belgaon › मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, शेतशिवारामध्ये उपद्रव

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, शेतशिवारामध्ये उपद्रव

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 8:00PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहर व उपनगरामधून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रात्री उशिरा कामावरून घरी येणार्‍या वाहन चालकांचा पाठलाग करून त्यांना धोका निर्माण करीत आहेत. शालेय मुलांनाही त्यांचा उपद्रव होत आहे. मध्यरात्री त्यांच्या भुंकण्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. बेळगाव शहररात 10,000 पेक्षा जास्त मोकाट कुत्र्यांची संख्या आहे. या कुत्र्यांना ठार मारता येत नाही. ठार मारले तर मनपावर प्राणी संरक्षण संघटना खटला दाखल करू शकतात. यामुळे त्यांची संख्या वाढू नये यासाठी मनपाने त्यांच्या नसबंदीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नसबंदीची योजना एकदा राबविली आहे. त्यावेळी 5,500  कुत्र्यांची शस्त्रक्रिया केल्या.

पुन्हा नसबंदी योजना राबविण्यासाठी मनपाने नव्याने निविदा काढलेली आहे. एक महिन्यानंतर ती उघडण्यात येणार असून त्यानंतर एजन्सी ठरेल. नसबंदीची मोहीम सतत चार ते पाच वर्षे राबविली पाहिजे. तरच त्यांची संख्या आटोक्यात राहू शकते, असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांनी सांगितले. शिवारामध्येही उपद्रव मोकाट कुत्र्यांचे अनेक कळप वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ, बसवण कुडची शिवारामध्येही वावरत असून भातपिकाची मळणी करून गवत गंज्या घातल्या आहेत. त्यावर नाचून पायानी ओढून गंज्या विस्कटून टाकत आहेत. उपनगराजवळील शेतकर्‍यांनाही मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आहे.

त्यांच्याकडून गवत गंज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वैतागले आहेत. त्यांचा बंदोबस्त मनपा आरोग्य विभागानेच केला पाहिजे. एका  कुत्र्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी मागील वेळेला निविदा स्वीकारलेल्या एजन्सीने 710 रु. प्रमाणे दर घेतला होता. आता नव्याने निविदा काढली जाईल, त्यावेळी हा खर्च 1000 रु. पयर्ंत वाढण्याची शक्यता असल्याचे डॉ. नाडगौडा यांनी  गितले. शिळे अन्न, मटण, चिकनची हाडे कचर्‍याच्या ठिकाणी दररोज टाकली जातात. त्यावरच ही मोकाट कुत्री तुटून पडतात.  अन्न शोधण्यासाठी केरकचरा विस्कटून टाकत आहेत. त्यांना हुसकावून वण्याचा प्रयत्न केला तर ती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढण्यास केरकचर्‍यातील शिळे अन्न, मटण, चिकनची व काही ठिकाणी बीफमधील हाडे  प्रमुख कारण आहे.