Thu, Apr 25, 2019 07:52होमपेज › Belgaon › ‘शूज भाग्य’करिता बेळगाव शैक्षणिकसाठी ३८.१४ कोटी

‘शूज भाग्य’करिता बेळगाव शैक्षणिकसाठी ३८.१४ कोटी

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 11 2017 8:08PM

बुकमार्क करा

बेळगाव ः महेश पाटील  

राज्य सरकारने पहिली ते दहावीपर्यंत सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘शूज भाग्य’ योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने पहिले ते पाचवीपर्यंतच्या 1,17,999, सहावी ते आठवीपर्यंतच्या 60,881 आणि नववी ते दहावीपर्यंतच्या 16,944 विद्यार्थ्यांना शूजचे वितरण करण्यात येणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 38 कोटी 13 लाख 97 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आतापर्यंत शूज भाग्य योजनेंतर्गत केवळ 40 टक्के शूजचे वितरण करण्यात आलेे आहे.  पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आकारातील आवश्यकतेनुसार शूज आणि सॉक्स देण्यासाठी विविध रक्कम ठरविण्यात आली आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जोडला 265 रु., सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जोडला 295 रु. आणि नववी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जोडला 325 रू. दर ठरविण्यात आला आहे. त्यानुसार 12 कोटी 37 लाख 943 पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आणि नववी ते दहावीपर्यंतच्या 1 कोटी 95 लाख 824 विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स देण्यात येणार आहेत. त्यासाठी 38 कोटी 13 लाख 977 हजारची तरतूद केली आहे.  सरकारने सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी गणवेश, सायकल, पाठ्यपुस्तके मोफत देण्याबरोबरच शूज, सॉक्स देण्यास प्रारंभ केलेला आहे.