Wed, Jan 16, 2019 17:51



होमपेज › Belgaon › शहापूर तणाव : महासंचालकांकडून झाडाझडती

शहापूर तणाव : महासंचालकांकडून झाडाझडती

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:17AM

बुकमार्क करा





बेळगाव ःप्रतिनिधी

शहापूर-वडगाव परिरात धार्मिक तणाव होण्याची शक्यता असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना देण्यात आली होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तरीही पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने खडक गल्ली परिसरातही पडसाद उमटले. यापुढे तरी पोलिस अशा माहितीनंतर खबरदारी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महिन्याभराच्या काळात बेळगावात होत असलेल्या जातीय दंगलींची गंभीर दखल उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक रामचंद्रराव यांनी घेताना पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केली. दंगल प्रकरणी त्यांनी पोलिस अधिकार्‍यांची बैठक बोलावून गेल्या महिनाभरात घडलेल्या जातीय दंगलींची सविस्तर माहिती घेतली. 

संवेदनशील परिसरात होणार्‍या जातीय दंगलींना आवर घालण्यासाठी त्या त्या भागातील पोलिसांनी दक्ष रहावे, समाजकंटकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवावी, गुंडांच्या हालचालींची माहिती ठेवावी, अशी सूचना रामचंद्रराव यांनी केली आहे.