Wed, Mar 27, 2019 02:22होमपेज › Belgaon › समादेवी गल्लीतील मंदिरात चोरी

समादेवी गल्लीतील मंदिरात चोरी

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:20AM

बुकमार्क करा

बेळगाव (प्रतिनिधी) 

गौड सारस्वत समाजाच्या समादेवी गल्लीतील हरी मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाली. खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी मंंंदिराच्या कपाटातील कुलूप तोडून पूजेसाठी वापरण्यात येणार्‍या चांदीच्या वस्तू लंपास केल्या आहेत. त्यांची किंमत 5 हजार रु. आहे.  तसेच तिजोरी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊन ती फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. 
नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी  राघव पांडुरंग हेरेकर यांनी मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. इतर सामान विस्कटल्याचे दिसून आल्याने चोरट्यांनी आणखी काही गवसते का, याची चाचपणी केल्याचा संशय आहे.