Mon, Jun 17, 2019 15:12होमपेज › Belgaon › डोळ्यात तिखट फेकून लुटले तब्बल 24 लाख

डोळ्यात तिखट फेकून लुटले तब्बल 24 लाख

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 07 2017 12:23AM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

वसुलीसाठी बेळगावला आलेले तुमकूरचे फूल व्यापारी नारायण मुद्दाप्पा (वय 48) यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याकडील 24 लाख 22 हजार रुपये लुटण्यात आले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आझादनगर परिसरातील सार्वजनिक ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रणाची मदत घेतली जात आहे. नारायण यांना ओळखणार्‍यांपैकीच ही लूट केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
तुमकूर जिल्ह्यातील सिरा गावचे ते अनेक शहरांतील किरकोळ फूल व्यापार्‍यांना फुले पुरवतात. वसुलीसाठी नारायण रविवारी बेळगावला आले होते. दोन दिवसांच्या वसुलीनंतर सोमवारी मध्यरात्री तुमकूरला जाण्यासाठी ते आझादनगर येथील सागर हॉटेलजवळ बसच्या प्रतीक्षेत ते थांबले होते. मुंबई-पुण्याहून येणार्‍या खासगी बसेस या हॉटेलजवळ थांबतात.

नारायण बसमध्ये चढण्याच्या तयारीत असताना काही कळण्याच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकट्याने नारायण यांच्या डोळ्यात चटणी पावडर टाकली. त्यानंतर नारायण यांच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. नारायण यांनी त्यांना प्रतिकार केला. मात्र, गळ्याला सुरा लावल्यामुळे त्यांनी बॅग सोडून दिली. राष्ट्रीय महामार्गावर सदर प्रकार घडत असताना चोरट्यांना रोखण्याचे धाडस कुणीच दाखवले नाही. शोधासाठी कॅमेर्‍यांची मदत.

शोधासाठी कॅमेर्‍यांची मदत 

 प्रतिनिधी चोरटे आणी नारायण यांच्यात झटापट सुरु असल्याचे पाहून बस चालकाने काढता पाय घेतला.च ोरट्यांनी नारायण यांच्या कडील बॅग हिसकावून घेताना त्यांच्या सोबत असलेल्या व काही अंतरावर संपर्क रस्त्यावर थांबलेल्या साथीदाराकडे बॅग सोपवल्यानंतर चोरटे पसार झाले. नारायण यांनी आरडा ओरड केली परंतु त्यांच्या मदतीला कुणीच आले नाही.काहीवेळा नंतर तेथील काहींनी नारायण यांची विचारपुस केली.घडलेल्या प्रकाराची माळमारुती पोलिसांना माहिती कळवीण्यात आली.मंगळवारी दुपारी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली.पोलिस निरीक्षक चन्नकेशव टिंगरेकर या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.चोरीच्या घटनेमागे माहितगाराचा हात असण्याची दाट शक्यता टिंगरेकर यांनी व्यक्त केली आहे.चोरट्यांचा छडा लावण्यासाठी संपर्क मार्गावरील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मदत घेतली जात आहे. नारायण दर महिन्याला बेळगावला येतात.