Fri, Jul 19, 2019 18:24होमपेज › Belgaon › टेंगिनकेरा गल्लीतील विवाहितेची आत्महत्या : पतीला अटक 

टेंगिनकेरा गल्लीतील विवाहितेची आत्महत्या : पतीला अटक 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

टेंगिनकेरा गल्ली येथील  विवाहिता महिलेने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. रेखा श्रीधर देसाई (वय 30 रा.टेंगिनकेरा) असे मृत महिलेचे नाव आहे.  या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्यांकडून  हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार मार्केट पोलिस स्थानकात दिली आहे. मृत रेखाचे माहेर  येळ्ळूर असून तिचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

सासराच्या मंडळीकडून हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार रेखाच्या आई-वडिलांनी केली आहे. यावरुन मार्केट पोलिसांनी पती श्रीधर सुभाष देसाई (वय 34) याला अटक केली आहे.  त्याच्यावर 498  ए, 306 सहकल 36, कलम 3, 4, हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.