Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Belgaon › रामदासकडून कुमारला आठव्या मिनिटात अस्मान

रामदासकडून कुमारला आठव्या मिनिटात अस्मान

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 8:47PMबेळगाव : प्रतिनिधी     

सांगलीच्या रामदास पवारने  पंजाबच्या कुमारवर केवळ आठव्या मिनिटाला मात करत कै. चुडाप्पा हलगेकर कुस्ती मैदान मारले. तिसर्‍याच मिनिटाला कुमारने एकेरीपट काढून रामदासला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण रामदासने सुटका करुन घेतली. 7 व्या मिनिटाला दुहेरीपट काढून रामदासने कुमारवर ताबा मिळविला. पण कुमारने सुटका करून घेतली. 8 व्या मिनिटाला  रामदासने पुन्हा एकेरी पट काढून कुमारला  चारीमुंड्या  चित करून  15 हजार कुस्ती शौकिनांची मने जिंकली. 

रविवारी रात्री निकाली कुस्त्या झाल्या. रामदास पवार सांगली वि. हरियाना केसरी कुमार पंजाब यांची कुस्ती भाजप नेते डॉ. रवि पाटील, डॉ. समिर शेख, मारूती कुगजी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, अनिल चौधरी आदिंच्या हस्ते मुख्य कुस्ती लावण्यात आली. दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन अप्पाशी तावशी व सागर अथणी यांच्यात झाली. अप्पाशीने 7 व्या मिनिटाला एकेरीपट काढून मानेवर घुटना ठेवत घुटना डावावर विजय मिळविला.

 तिसर्‍या क्रमांकाची कुस्ती  कर्नाटक कुमार सूरज घाडी वि. सचिन बारगुंळे इचलकंरजी यांच्यात झाली.  सूरजने सचिनला एकचाक डावावर चित करून मेंढ्याचे बक्षीस पटकाविले.
प्रशांत चापगाव वि. परशराम दावणगिरी यांच्या चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रशांते आकडी लावून मात केली. रोहित पाटील वि. सचिन इंगळगी यांच्यातील सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत  रोहित पाटीलला विजय घोषित करण्यात  आले.

मनोहर  पाटील कंग्राळी वि. विरेश कक्केरी यांच्यात विरेशने एकेरी कस काढून लढत जिंकली. तर आठव्या क्रमांकाची हरिश्चंद्र बेळगुंदी वि. अमर निलजकर कंग्राळी यांच्यातील कुस्ती बरोबरीत राहिली. सागर सादळे इचलकरंजी वि. चिक्काप्पा मुद्योळ या कुस्तीत चिक्कप्पाने झोळीवर विजय मिळविला.  निरंजन येळ्ळूर वि. अमर बंबरगा लढतीत निरंजनने विजय मिळविला.

हणमंत भांदुर गल्ली, सुनिल बडगेर, पंकज कडोली, लक्ष्मण गोवकर, शेखराज पिरनवाडी, गजानन बन्नाळी,  श्रीकांत मुधोळ, मलिंगराज बागलकोट, शुभम कुद्रेमनी, अजित कंग्राळी, दिवाकर माने, ओम कंग्राळी, प्रितेश किणये, कपिल हल्याळ,महेश तीर्थकुंडे, हर्षल पाटील, राहुल किणये, श्रीधर रणकुंडे, अर्जुन रामदुर्ग, उत्कृर्ष, अमर, विठ्ठल, गुरूलिंग,  पवन कंग्राळी, श्री घाडी, प्रथमेश, विशाल व गुरू यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. कुस्तीचे समालोचन सीएम पाटील व शिवकुनज माळी इचलकरंजी यांनी केले.