Sun, Apr 21, 2019 14:37होमपेज › Belgaon › रेडिओ न्यूक्‍लियर थेरपीमुळे उपचार गतीने

रेडिओ न्यूक्‍लियर थेरपीमुळे उपचार गतीने

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:46PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी    

केएलई संस्थेने वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात चालविलेले कार्य उल्लेखनीय आहे. इस्पितळामध्ये अत्याधुनिक साधनांद्वारे उपचार करण्यात येत असून समाजात बदल घडवून आणण्याचे कार्य संस्थेने चालविले आहे. इस्पितळामधून मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत असून संस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गगार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी काढले. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ? वैद्यकीय संशोधन केंद्रामध्ये सुमारे 15 कोटी रु. खर्चाच्या जैविक कोष व रेडिओ न्यूक्‍लियर थेरपी केंद्र उभारण्यात आले असून याचे लोकार्पण केंद्रीयमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. रोग निदान व रुग्णांवर अत्याधुनिक यंत्रोपणकरणाच्या सहाय्याने वेळीच उपचार करणे जैविक कोष व रेडिओ न्यूक्‍लियर थेरपीने शक्य होणार असल्याचे राजनाथसिंग म्हणाले. शरीराचा कोणता भाग कशा पध्दतीने कार्य करतो, रुग्णाच्या शरीरच्या कोणत्या भागाला आजाराने बधिरता आली आहे.

रक्तवाहिन्या, रक्ताभिसरणाचे कार्य कशा पध्दतीने सुरू आहे. या प्रक्रियेत कोणता अडथळा आला असल्यास त्यावर चिकित्सा करणे रेडिओ न्यूक्‍लियर थेरपीने शक्य होणार असल्याची माहिती यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आली. यावेळी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष राज्यसभा सदस्य डॉ.प्रभाकर कोरे, खा. सुरेश अंगडी, खा. प्रल्हाद जोशी, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आ. संजय पाटील, डॉ. व्ही. आय. पाटील, संचालक अमित कोरे, अनिल पट्टेद, एस. सी. मेटगूड, अशोक बागेवाडी, डॉ. व्ही. एस. साधूनवर, डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. विवेक सावोजी, डॉ.रश्मी अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते.