Wed, May 27, 2020 01:26होमपेज › Belgaon › पोक्सो आरोपातून निर्दोष मुक्तता

पोक्सो आरोपातून निर्दोष मुक्तता

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:30PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

शालेय  मुलीवर अत्याचार करून  त्याची सिडी तयार करून शाळेच्या प्राचार्याना पाठवली होती. याचा खडेबाजार पोलिसांनी तपास करून  शिवकुमार राजेंद्र बाळेकुंद्री (रा. नार्वेकर गल्ली सध्या रा. महांतेशनगर) याच्यावर पोक्सो अंतर्गत खटला दाखल केला होता. न्यायालयात सिडी दाखल करण्यात आली नसल्याच्या कारणावरून तृतीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. शिवकुमार बाळेकुंद्री व अत्याचारग्रस्त मुलगी यांच्या कुटुंबियांची मैत्री असल्याने मुलेमुली एकमेकांच्या घरी ये-जा करीत होते. यावरून आरोपी शिवकुमारने त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले व  तिच्याबरोबर तिची आई घरी नसताना अश्‍लील चाळे करीत होता.

नोव्हेंबर 2016 मध्ये एका रविवारी आरोपी मुलीच्या घरी येऊन तिच्याबरोबर चाळे करताना तिच्या आईला सापडला. त्यावेळी तेथून तो पळून गेला. या घटनेनंतर मुलीचे कुटुंबीय घर बदलून दुसर्‍या ठिकाणी राहण्यास गेले. परंतु शिवकुमार मुद्दाम त्यांच्या घरासमोर फेर्‍या मारत होता. मुलीबरोबर अत्याचार केलेली सिडी त्याने मुलीच्या शाळा मैदानावर टाकली होती. ती वॉचमनने घेऊन फेकून दिली होती. नंतर पुन्हा त्याने प्राचार्याच्या नावाने दुसरी सिडी  पाठवली. प्राचार्यानी सिडी पाहून मुलीच्या पालकांना बोलावून घेतले. या प्रकरणी खडेबाजार पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. पोलिसानी शिवकुमारवर पोक्सो कायद्यांतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 67 खाली खटला दाखल केला. सुनावणी होऊन न्यायालयाने सिडी दाखल केली नसल्याच्या कारणावरून  त्याची  निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अ‍ॅड.श्यामसुंदर पत्तार, हेमराज बेंच्चण्णवर, विशाल चौगुले व एस. बी. पट्टण यांनी काम पाहिले.