Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Belgaon › प्लास्टिक पिशव्यांना रिकामी शहाळ्याचा पर्याय

प्लास्टिक पिशव्यांना रिकामी शहाळ्याचा पर्याय

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 8:37PMबेळगाव : महेश पाटील

पर्यावरणपूरक शेती कशी करावी? कसे उत्पन्न मिळवावे? आणि या माध्यमातून इतरांना कसा रोजगार मिळवून द्यावा, याचे उत्तम उदाहरण खानापूर तालुक्यातील युवकाने घालून दिले आहे आणि याची दखल राज्याच्या पर्यावरण खात्यानेही घेतली आहे. खानापूर तालुक्यातील देवलत्तीसारख्या मागासलेल्या खेड्यातील उमेश होसूर यांनी ही किमया साध्य केली आहे. शेती करीत असताना बर्‍याचवेळा जवळपास 90 टक्के ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या वापरून रोपांची लागवड केली जाते.

विशेष करून आळंबी व अन्य रोपे उगविण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. यावर तोडगा म्हणून उमेश होसूर यांनी शक्कल वापरून पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या शहाळांचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीचा उपक्रम आपल्या शेतामध्ये राबविला आहे. पर्यावरणपूरक आणि सेंद्रीय खात्याचा वापर करून मिरच्याची लागवड केल्याने या मिरच्या आरोग्यासाठीही अत्यंत चांगले असल्याचे निष्पन्न झाले आहे.  याची दखल राज्याच्या पर्यावरण खात्याने घेतली आहे.