Sun, Jul 21, 2019 16:58
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › दोन महिन्यात पासपोर्ट कार्यालय सुरू

दोन महिन्यात पासपोर्ट कार्यालय सुरू

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:02AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

देशातील 156 ठिकाणच्या पासपोर्ट कार्यालयाच्या कामाला विलंब झाला आहे. मात्र, पुढील दोन महिन्यात बेळगावात पासपोर्ट कार्यालय सुरू होर्ईल, असे आश्‍वासन परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दिले आहे.  सिटीझन कौन्सिलच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी बेळगाव दौर्‍यावर आलेल्या ज्ञानेश्‍वर मुळे यांची भेट घेतली. त्याचबरोबर बेळगावातील पासपोर्ट कार्यालयासंदर्भात त्यांना निवेदन दिले. 

यावेळी  सतीश तेंडोलकर यांनी बेळगावला पासपोर्ट कार्यालयाचा कारभार लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर बेळगावमागून काही शहरांना पासपोर्ट कार्यालयला मंजुरी मिळाली होती. त्या शहरातील कार्यालयांचे काम काज सुरू झाले आहे. त्यामुळे बेळगावला लवकरात लवकर पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात यावे. बेळगाव शहरात अनेक उद्योगधंदे आहेत. शहर शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पासपोर्टची नितांत आवश्यकता असते.

या भागातील नागरिकांनी केलेल्या निरंतर मागणीमुळे गेल्यावर्षी बेळगावला पार्सपोर्ट सेवाकेंद्र मंजूर झाले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात होते. कोल्हापूरचे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले तरी बेळगावचे केंद्र सुरू झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे बेळगावला लवकरात लवकर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी तेंडोलकर यांनी केली. 

यावेळी  मुळे यांनी देशातील 156 ठिकाणच्या पासपोर्ट कार्यालयाच्या कामकाजाला काहीसा उशीर झाला आहे. मात्र, बेळगावचे शहराचे महत्त्व ओळखून येथील कार्यालय पुढील 60 दिवसांत सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. यावेळी सिटीझन कौन्सिलचे  सदस्य सेवंतीलाल शहा, बसवराज जवळी, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.