Thu, Jul 18, 2019 08:54होमपेज › Belgaon › थकीत ऊस बिले त्वरित द्या

थकीत ऊस बिले त्वरित द्या

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:06PM बेळगाव ;  प्रतिनिधी

अनेक वेळा मागणी करूनही कारखान्याना ऊसपुरवठा केलेल्या शेतकर्‍यांना थकित बिल देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊनही उपयोग झालेला नाही. आश्‍वासन देऊन फसवणूक केली जाते. कृषिक शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आवारात बेमुदत उपोषण आंदोलन हाती घेण्यात आले. गोकाकचा सौभाग्यलक्ष्मी कारखाना व उदपुडी येथील शिवसागर अ‍ॅग्रो प्रॉडक्टस कारखान्यांना 2013  ? 14, 2015 ? 16 मध्ये शेतकर्‍यांनी ऊसपुरवठा केला होता. मात्र कारखान्यांकडून उसाचे थकीत बिल दिलेले नाही. शेतकर्‍यांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र कारखान्यांनी याची दखल घेतली नाही.

थकित बिलासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र उपयोग झाला नाही. सुवर्णसौधमध्ये झालेल्या अधिवेशनावेळी सरकारचे लक्ष वेधण्यास आंदोलन केले होते. पण आश्‍वासन देऊन शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली. शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात  आला. शेतकर्‍यांनी भजन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारने नेहमीच साखरलॉबीच्या बाजूने काम केलेे,  शेतकर्‍यांची फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला. शेतकरी नेते सिध्दयोडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन हाती घेण्यात आले. खानापूर, बेळगाव, गोकाक, बैलहोेंगल तालुक्यातील शेतकर्‍यांनी आंदोलनात भाग  घेतला.