Thu, Jan 24, 2019 05:50होमपेज › Belgaon › ‘ओखी’चा फटका

‘ओखी’चा फटका

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:30AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

ओखी वादळाचा फटका बेळगाव परिसराला बसला आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. दोन दिवसांपासून किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागात ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. बेळगावलाही मंगळवारी ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती आली. ढगाळ वातावरणाचा आणि पावसाच्या हलक्या सरींचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसला. सध्या सुगीची कामे शेवटच्या टप्यात असून शिवारात धांदल उडालेली आहे. भात मळणी सुरू असणार्‍या भागात शेतकर्‍यांना पावसापासून पीक वाचविण्यासाठी यातायात करावी लागली. 
यामुळे शेतकरी हवालदिल बनल्याचे दिसून आले.

बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यालादेखील बसला आहे. दोन दिवसांपासून डोकेदुखी, थंडी, ताप, अंगदुखीची तक्रार असणार्‍या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरातील अनेक दवाखान्यांतून रुग्णांनी उपचारासाठी गर्दी केली आहे. विशेषत: लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.