Sat, Jan 19, 2019 13:44होमपेज › Belgaon › मील्स ऑन व्हील्स ने केली जागा मोकळी

मील्स ऑन व्हील्स ने केली जागा मोकळी

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 8:21PMबेळगाव : प्रतिनिधी 

विनापरवाना आणि भूभाडे अदा न करता आरपीडी मार्गावर मील्स ऑन व्हील्स व्यवसाय मनमानीपणे फोफावत होता. याकडे मनपाचे साफ दुर्लक्ष झाले होते. दै. ‘पुढारी’ने 23 जानेवारी रोजी दिलेल्या सचित्र वृत्ताची दखल घेऊन मनपा व टिळकवाडी पोलिसांनी मील्स ऑन व्हील्स वाहन व्यावसायिकांना जागा मोकळी करण्याची सूचना केली. आरपीडी समोरील रात्रीचा व्यवसाय बंद झाला आहे.  शहर उपनगरात एकूण 3300 बैठे आणि फेरीवाले आहेत. त्यांच्याकडून मनपाच्यावतीने प्रत्येक दिवशी भूभाडे आकारले जाते. मनपाच्यावतीने 300 प्रकारच्या उद्योग व व्यवसायांना परवाने दिले जातात. मात्र बेळगाव शहरात चारचाकी वाहने रस्त्याशेजारी लावून मील्स ऑन व्हील्स तसेच अन्य व्यवसाय सुरू झाले आहेत.

काही जण आपल्या चारचाकी वाहनातून फळे, कपडे विक्री करत आहेत. काहींनी छोट्या वाहनातून अन्य प्रकारचे छोटे व्यवसाय चालवले आहेत.हा सारा प्रकार शहरातील विविध मार्गावर सर्रास दिसून येत असताना विनापरवाना केल्या जाणार्‍या वाहनातील त्या व्यवसायाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत होते.  काही दिवसांपासून हिंदवाडी आरपीडी महाविद्यालयासमोरील रस्त्याशेजारी चारचाकी वाहनातून खमंग खाद्यपदार्थ विकले जात होते.रस्त्याशेजारी वाहने व फुटपाथवर टेबलखुर्च्या असा आगळाच थाट त्या ठिकाणी दिसत होता. रात्री उशिरापर्यंत खवय्यांची गर्दी दिसत होती. नव्याने सुरू झालेल्या त्या वाहनातील व्यावसायिकाकडे मनपाचा कोणताच परवाना नाही.

भूभाडेही भरून घेतले जात नसल्याची चर्चा होती. यामुळे अनधिकृतपणे चाललेल्या त्या नव्या वाहनातील व्यवसायाला मनपाच खतपाणी घालत असल्याचा आरोप केला जात होता. या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल मनपा आरोग्यधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांनी घेतली. नाडगौडा यांनी हिंदवाडी भागातील वॉर्ड क्लार्कला विनापरवाना व्यवसायाबाबत जाब 
विचारला.परवाना घेऊन व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, याबाबतची सूचना देण्यास सांगितले.