Wed, Jul 08, 2020 03:32होमपेज › Belgaon › विवाहितेवर बलात्कार

विवाहितेवर बलात्कार

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

शौचास निघालेल्या महिलेवर रविवारी रात्री बलात्कार झाला आहे. याप्रकरणी नवीनकुमार कांबळे व शिवानंद यरगट्टी या दोघांना यमकनमर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवाहितेवरील बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यमकनमर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला रविवारी रात्री शौचाला जात असताना अंधारात दबा धरून बसलेल्या नराधमांनी तिच्यावर झडप घातली. तिला नजीकच्या निर्जन परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, ती महिला बर्‍याच उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका ठिकाणी ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीतून तिच्यावर बलात्काराची माहिती उघड झाली. त्यानंतर यमकनमर्डी पोलिस ठाण्यात नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार यमकनमर्डी पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू केला. काही वेळातच त्यांनी नवीनकुमार कांबळे व शिवानंद 

यरगट्टी यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून बलात्कारप्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. सोमवारी पिडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. बलात्काराचा प्रकरणात अन्य काही आरोपी आहेत का? याचाही यमकनमर्डी पोलिस शोध घेत आहेत.