Mon, Apr 22, 2019 23:40होमपेज › Belgaon › बेळगावात उलगडणार ‘अर्धसत्य’चे गूढ

बेळगावात उलगडणार ‘अर्धसत्य’चे गूढ

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 11:04PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी रंगभूमीवर सध्या ‘अर्धसत्य’ या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन प्रवृत्तींमधील नाट्यमय संघर्ष आणि सत्य-असत्यामधील संभ्रम या विषयावर आधारलेल्या अर्धसत्य नाटकाचा प्रयोग बेळगावातील केएलई शताब्दी सभागृहात गुरुवार दि. 1 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. अर्धसत्यमधील रहस्य डॉ. अमोल कोल्हे आणि दीपक करंजीकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने रंगणार आहे.  

शार्गी प्रोडक्शन आणि भूमिका थिएटर्स निर्मित निर्माते मुकेश शिपूरकर यांनी अर्धसत्यची निर्मिती केली आहे. कुमार सोहनी यांचे कल्पक दिग्दर्शन लाभलेल्या अर्धसत्य नाटक दहशतवादावर आधारित आहे. या नाटकाची सुरुवात आणि अंतही एका बातमीनेच होतो. यावरूनच नाटकाच्या रहस्यमय कथेची जाणीव होते. बातम्यांच्या आधारावर आपण विविध प्रकारचे अंदाज बांधत असतो. बातम्यांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचा विचार केला जातो.  वृत्तीप्रवृत्तीला बंधनात ठेवण्याचे काम समाज व्यवस्था करते. अर्धसत्य नाटकात यंत्रणा-व्यवस्था आणि वृत्ती  आणि प्रवृत्तीचा नाट्यमय संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

 नाटकातील दोन महत्वाची पात्रे दिगंबर गोडसे (डॉ. अमोल कोल्हे) प्रामाणिक आणि धाडसी पोलिस इन्स्पेक्टर तसेच  दीपक करंजीकर यांनी कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्तांची भूमिका साकारली आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणार्‍या या नाटकातील अभिनयाची जुगलबंदी बेळगावकरांना अनुभवता येणार आहे.