Sun, Feb 23, 2020 10:04होमपेज › Belgaon › मराठी अस्मितेसाठी साहित्य संमेलने महत्त्वाची

मराठी अस्मितेसाठी साहित्य संमेलने महत्त्वाची

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:39PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

मराठी संस्कृती, अस्मिता व वाचन चळवळ टिकविण्यासाठी साहित्य संमेलने मोलाची आहेत. ही चळवळ अखंडपणे चालविण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे. प्रत्येक गावात वाचनालयांची नितांत आवश्यकता आहे. सीमाभागात अशा संमेलनाची गरज आहे. या माध्यमातून प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडते, असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले. मायमराठी संघ, सांबरा आयोजित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांनी केले.

संमेलन मंडपाचे उद्घाटन जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी केले. ज्ञानेश्‍वर प्रतिमा पूजन ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, शिवप्रतिमा पूजन जयवंत पाटील, सरस्वती फोटोपूजन काशिनाथ धर्मोजी, दुर्गादेवी प्रतिमा पूजन बाळासाहेब काकतकर, म. ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन परशराम बेडका, लोकमान्य टिळक प्रतिमा पूजन जयराज हलगेकर, सावित्रीबाई प्रतिमा पूजन, लक्ष्मण होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कै. जी. एल. अष्टेकर व्यासपीठाचे उद्घाटन नागोजी पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष उल्हासदादा पवार, साहित्यिका विजया वाड, चंद्रकांत जोशी, प्रा. अनिल चौधरी, अशोक याळगी, भाऊराव गडकरी, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, स्वागताध्यक्ष दिलीप चव्हाण आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडले.  मान्यवरांचा सत्कार शारदा गोविल, पिराजी पालकर, रामचंद्र देसाई, भुजंग धर्मोजी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

संमेलनाचे उद्घाटक अशोक याळगी म्हणाले, सीमाप्रश्‍नाचा लढा प्रदीर्घ काळापासून चालू आहे. अखेरच्या घटकेपयंर्ंत समितीशी एकनिष्ठ राहून लढा देत राहू. सध्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. संमेलनातून नव्या पिढीला ऊर्जा व जाणीव मिळते. मराठी साहित्यिकांना ऐकण्याची संधी सीमावासियांना मिळते. म्हणून अशा संमेलनाची गरज आहे. पुस्तकातून आपल्याला आनंदाचा झरा, विज्ञानाची क्रांती, ज्ञानाची हिरवळ भावभावनांचे आविष्कार, मानवी संस्कृतीची कहाणी अनुभवयाला मिळते. यासाठी वाचनावर प्रेम करा असेही त्यांनी सांगितले.