Wed, Feb 20, 2019 06:32होमपेज › Belgaon › दूध टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दूध टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:54PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

रविवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात तिघांचा बळी गेला असताना सोमवारी सकाळी 11 वा. उद्यमबाग बेम्को क्रॉसजवळ दुधाच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महमद याकूबनूर महमदशेख (वय 46, रा. देशपांडे गल्ली फोर्टरोड) गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. दक्षिण रहदारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महमद हा  नेहमीप्रमाणे कारखान्यात कामासाठी आपल्या दुचाकीवरून निघाला होता.  बेम्कोनजिक महमदच्या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या दुधाच्या टँकरने धडक दिली. त्यामुळे महमद रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. रहदारी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  गंभीर जखमी अवस्थेतील महमदला जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी नेण्यात येत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.