Thu, Jun 20, 2019 06:30होमपेज › Belgaon › मेळाव्यास न येणार्‍या नेत्यांना प्रवेश बंदी

मेळाव्यास न येणार्‍या नेत्यांना प्रवेश बंदी

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 8:51PMबेळगाव  :  प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जुने बेळगाव येथील म. ए. समितीचे कार्यकर्त्यांतर्फे कलमेश्‍वर मंदिर पंटागणावर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला सर्वच नेत्यांनी उपस्थित राहण्यासाठी जुने बेळगाव, भाग्यनगर, वडगाव, भारतनगर येथील नेत्यांची मनधरणी करण्यासह मेळाव्याला न येणार्‍या नेत्यांना जुने बेळगाव परिसरात प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला राजू मरवे, नगरसेवक दिनेश राऊत, सुरेश रेडेकर, रतन मासेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, मनोहर होसूरकर यांची प्रमुख उपस्थितीती होती. 
जुने बेळगाव, वडगाव येथील कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार मनोहर होसूरकर यांच्या पुढाकाराने भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मेळाव्याच्या व्यासपीठाला हुतात्मा शंकर खन्नूकर यांचे नाव देण्यात येणार आहे.  

कीर्तीकुमार कुलकर्णी म्हणाले, सर्वच नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे. नेत्यांची बेकी समितीच्या प्रयत्नांना खिळ घालत आहे. एकीसाठी सर्वांनी प्रयत्न करूया. राजू मरवे म्हणाले, सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात दाव्याला बळकटी आणण्यासाठी समितीच्या अधिकृत उमेदवाराला विधानसभेत पाठवू. रतन मासेकर म्हणाले, मेळाव्याला महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांना बोलावून येथील नेत्यांना एकीचे महत्त्व ठणकावून सांगू. 

नितीन खन्नूकर म्हणाले, राष्ट्रीय पक्ष हालचाली गतिमान करीत असून. विविध आमिषे दाखवत आहेत. त्याम जनजागृती करून निवडणुकीत धडा शिकवूया. आर. एस. पाटील, शंकर चौगुले, श्रीधर खन्नूकर, दौलत साखर कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनोहर होसूरकर, बाबू कोले यांनीही चर्चेत भाग घेतला. यावेळी उदय होनगेकर, जोतिबा देसूरकर, शांताराम होसूरकर, जोतिबा भोसले, मोहन बेनके, विजय पाटील, विलास धामणेकर, नारायण बेनके, गंगाधर बिर्जे, कुंडेकर, सैनुचे उपस्थित होते.