Sun, May 19, 2019 22:24होमपेज › Belgaon › लक्झरीची ट्रॅक्टरला धडक; 1 ठार

लक्झरीची ट्रॅक्टरला धडक; 1 ठार

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 09 2017 12:26AM

बुकमार्क करा

बेळगाव/निपाणी ः प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकतीनजीक मुक्तीधाम मठानजीक ऊसवाहतूक ट्रॅक्टरला भरधाव लक्झरी बसने मागून जोराची  धडक दिली. या अपघातात बसचा क्लिनर ठार, तर अन्य 3 प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास झाला. सिद्धरामू आर. राजन (वय 25,  रा. कोडीपुरकुट, जि. मंड्या) असे मयताचे नाव असून गंभीर जखमी तिघांवर बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती काकती पोलिसांनी दिली.  यात्राजिनी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पी.वाय.05 ए. 3709 ही बंगळूरहून पुण्याकडे जात होती. बसमध्ये 30 प्रवासी होते. बस मुक्तीधाम मठाजवळ आली असता चालक सनाउल्ला अब्दुल रेहमान (रा.बंगळूर) याने पुढे निघालेल्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरला (एम.एच.23 ए.एस. 978)  जोराची धडक दिली.

बस ट्रॅक्टरमध्ये घुसल्याने क्लिनर सिध्दरामुसह प्रवासी चंद्रकांत नरेंद्रकुमार पांडे (वय 30), जेम्स हेतेते (वय 25), एकनाथ विश्‍वनाथ सळके (वय 30) हे चौघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी  धाव घेत याची माहिती काकती पोलिसांना दिली. सीपीआय रमेश गोकाक, फौजदार अर्जुन हंचीनमनी यांनी भेट दिली. पुंजलॉईड कर्मचार्‍यांच्या मदतीने चौघांनाही 108 वाहनाने बेळगाव येथे हलविले. दरम्यान वाटेतच सिध्दरामू याचा मृत्यू झाला. याबाबत बसचा दुसरा चालक शिवा इरापा (रा.बंगळूर) याने फिर्याद दिली असून पुढील तपास फौजदार हंचीनमनी हे करीत आहेत.